ह्या पातळीवरचा भारताच्या ऊस शेतीमधील हा पहिलाच असा उपक्रम राबविण्यात आला आहे. ही डिजिटल कार्यशाळा एका अतिशय सोप्या मोबाईल ॲपवर वितरित केलेली असून, शेतकरी आपल्या शेताचे निरीक्षण करू शकतात, आपल्या शेतावरचे अचूक आणि ताजे हवामान संकेत मिळवू शकतात, ऊस-केंद्रित पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेसच्या सहाय्याने उत्तम व शास्त्रशुद्ध पद्धतीने ऊस लागवड करू शकतात तसेच ऊस लागवडीत त्यांना निरंतर पुढे राहण्यासाठी सुप्रसिद्ध ऊस तज्ज्ञ डॉ अंकुश चोरमुले ह्यांनी विकसित केलेल्या शैक्षणिक मोड्यूलचा लाभ देखील घेऊ शकतात. आणि हे परिपूर्ण असे पॅकेज १,४९९/- रुपयांच्या अतिशय रास्त किमतीत उपलब्ध आहे.
अजित घोलप हे कृषिपदवीधर शेतकरी असून मागील २० वर्षापासून ते आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. शेती करताना टोमॅटो पिकावर विशेष लक्ष केंद्रित करून ४ हजार पेक्षा जास्त कॅरेट म्हणजेच जवळपास एकरी १०० टन टोमॅटो काढण्याचा त्यांचा विक्रम आहे. शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करणे शक्य व्हावे याकरिता स्वतःच्या टोमॅटो शेतावर सगळ्या गोष्टी प्रात्यक्षिक पद्धतीने दाखवून लागवड ते उच्चांकी उत्पादन काढण्यासाठी हि डिजिटल कार्यशाळा बनवली आहे.
आज महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे नगदी पिक म्हणून सोयाबीनची ओळख आहे. सोयाबीन पिकाच्या वाण निवडीपासून ते बीजोत्पादनापर्यंतची सर्व माहिती डिजिटल कोर्सच्या माध्यमातून आपण घेणार आहोत.
भरडधान्य म्हणजेच मिलेट्स हा एकेकाळी आपल्या अन्नाचा मुख्य स्रोत होता. बदलत्या जीवनमानानुसार हा घटक अन्नातून दूर होत चालला होता. भारत सरकारच्या प्रयत्नातून संयुक्त राष्ट्राच्या महासभेत २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय श्रीधान्य (भरड धान्य वर्ष) म्हणून साजरे करण्याचे ठरले आहे. भरडधान्य आता श्रीधान्य म्हणून ओळखली जाणारी आहेत. भारताच्या भरडधान्य क्षेत्राला जागतिक पातळीवर पोहचविणार महेश लोंढे हे स्वतः कृषिपदवीधर आणि उद्योजक आहेत. भरडधान्य लागवडीपासून ते व्यावसायिक संधी यामधील सर्व विषयावर मराठीमधील पहिला डिजिटल कोर्स बनवला आहे. भरडधान्य खाणारे आणि शेती करणारे या दोघांसाठी हा डिजिटल कोर्स महत्वपूर्ण असणार आहे.
हवामान बदलाचा शेताला आणि शेतकऱ्यांना कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय गंभीर आर्थिक फटका बसतो. त्यामुळे शेतकर्यांनी त्यांच्या मूळ शेती उत्पन्नावर जास्त अवलंबून न राहता अतिरिक्त उत्पन्नाचे नवीनतम मार्ग शोधले पाहिजेत. असाच एक मार्ग आहे कृषी पर्यटनाचा. शेतकऱ्यांचा खर्च न वाढवता त्यांच्या शेतातून अतिरिक्त उत्पन्न कसे मिळवता येईल ह्या संदर्भात हा कोर्स अतिशय उपयुक्त आहे. कृषी पर्यटन ही केवळ पहिली पायरी आहे. आपल्याच शेतात शेतकऱ्यांना अशा अनेक मूल्यवर्धित सेवा किफायतशीरपणे देता येतील. तर आजच मात्र ९९९/- रुपयांची गुंतवणूक करा व शेतीपूरक उत्पन्नामार्गे आजन्म परतावा मिळवा.